युथ फॉर किनवट माहूर ही तरुणांची संघटना आहे. जगातील बहुसंख्य क्रांत्या ह्या नवतरुणांनीच घडवुन आणलेल्या आहेत. भारतात देखील महाराणा प्रताप , छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज , सेवालाल महाराज , गुरु गोविंदसिंह , सुभाषचंद्र बोस , भगतसिंह , सुखदेव , राजगुरू , बिरसा मुंडा , अश्फाक उल्ला खान यांचा इतिहास पाहिल्यास आपल्याला हे कळून येईल . स्वामी विवेकानंदांनी देखील राष्ट्राचे भविष्य हे तरुणांवर अवलंबुन असल्याचा निर्देश केला आहे. किनवट माहूरमधील तरुणांमध्ये राष्ट्रभावनेचा प्रचार आणि प्रसार करून त्यायोगे किनवट माहूरचे उत्थान करण्याचे काम युथ फॉर किनवट माहूर करणार आहे.